https://www.toprevenuegate.com/xbphdqttn?key=9960cc4b95970f157077139f8d7b630c

 Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक आणि अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर या ऑगस्ट महिन्यात पावसाने उघडीप दिली आहे.




राज्यात जवळपास 14 ते 15 दिवसांपासून पावसाचा खंड पाहायला मिळत आहे. भर पावसाळ्यात पाऊस गायब झाला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामातील वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना आता पावसाची नितांत गरज आहे. पण गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस गायब झाला असल्याने शेती पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे.

आता येत्या काही दिवसात जर पाऊस पडला नाही तर पिके करपण्याचा धोका देखील वाढत आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना चिंता करू नका आता पावसाला सुरुवात होणार असे सांगितले आहे. आज 16 ऑगस्ट रोजी पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, राज्यात आज पासून पावसाला सुरुवात होणार आहे.

हा पाऊस राज्यात पूर्वेकडून दाखल होणार असून सुरुवातीला पूर्व विदर्भात पावसाची तीव्रता वाढणार आहे. यानंतर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान राज्यातील पश्चिम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस पसरणार आहे. या कालावधीत राज्यातील जवळपास सर्वच भागात मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नदी-नाले भरून वाहतील असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. एकंदरीत या कालावधीमध्ये जोरदार पावसाची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे आतापर्यंत अहमदनगर आणि